Friday, 6 February 2015

Dev

विनवण्या, मागण्या आणि भोकाड पसरून रडणे,
पूजा-अर्चना म्हणू त्याला
रिकाम्या कळसातून उतू जाणाऱ्या अपेक्षा
आपण प्रार्थना म्हणू त्याला.

देव आहे, देव ऐकतो म्हणत
देवळासमोरच्या रांगा छोट्या होत चाल्या होत्या
देवला कळते तर वळत का नाही?
विश्वास खोटा, श्रद्धा खोट्या

धर्माने माणसाचा देवातला आणि
देवाचा माणसातला विश्वास नष्ट केला होता
रिकाम्या गभार्यात आवाज नुसता घुमात होता
देव कधीच निघुन गेला होता...

No comments:

Post a Comment